Friday, May 21, 2021

सांटा बार्बारा

आकाशातील रक्त छटांचे फटकारे वितळले
फिरून पुन्हा उगवून आली धमक्क पिवळी फुले।

खारी फिरती शेपट्यांचे फुलारून झुबके
झरे लागले पुनःश्च वाहू अवखळ आणि खुळे।

पंख पसरुनी परतू लागले पेलीकनांचे थवे
वाळूवरती ऋतूराजाची वाजतात पाऊले!

१९ एप्रिल २०१२

No comments:

Post a Comment