उंच तुमची अंगकाठी, आणि मान ताठ
गळ्यामध्ये तुमच्या घालू कसा हार?
मोगरीच्या कळ्यांची गुंफली ही माळ
तुमच्या उराची याला सोसेल का झळ?
ओवाळावे म्हणुनी हे पाजळले दिवे
तुमच्या तेजापुढे दीप माझे सावळे
नाम लावू द्यावा, जरा झुकवावी मान
भाळावारी तुमच्या तळपे उदयभान
ओवाळणी काय देता? सारे पावले हो मला!
ओवाळून टाकलेला जीव स्वीकारावा!
24 March 2012