Friday, May 21, 2021

झाडे आणि गांडुळे

दमदार वृक्ष उभे असतात ज्या जंगलात,
गांडूळांची मोठी फौज कार्यरत असते तिथल्या मातीत.

काही झाडांना जाणीव असते त्यांच्या वृद्धीतील गांडूळांच्या योगदानाची. 
ते जेव्हा सांगतात गांडूळांना, कि गांडुळे किती थोर आहेत,
तेव्हा गांडुळे म्हणतात, वा! वा! किती विनयशीलता! किती थोर आहे हे झाड!

गांडुळे कधीच खऱ्या अर्थाने थोर ठरत नाहीत.
कारण ती असतात आदत से मजबूर!
वृक्ष वाढावेत म्हणून नसतात ती राबत!
स्वतःच्या पोटासाठी मिळावेत काही मेलेले किडे आणि कुजकी पाने
म्हणून जमिनीच्या खालून फिरत रहातात ती माती उकरत उकरत…

थोर न ठरण्याबद्दल नसतेच गांडूळांची तक्रार!
मग या साऱ्याचा मी का करतीये विचार?

२२ मार्च १५

1 comment:

  1. खरय. सेन्सिटिव्ह मेंदू च असा विचार करत असतो. Keep thinking

    ReplyDelete