लाल आहे, हिरवा आहे,
पिवळा, निळा, जांभळा आहे,
शुभ्र नसला तरी थोडा
अब्रा-गब्रा पांढरा आहे.
प्रकाश विझल्यावर मात्र
आसमंत काळा आहे.
थोडा तर्क, थोडी समीकरणे,
बरीचशी हिशोबाची उदाहरणे,
दोन्ही बाजू बरोबर आणि
ताळा बरोबर बसला आहे.
तरीही काही शिल्लक राहते,
थोडे धन, थोडे ऋण.
आयुष्याची पस्तीस वर्षे:
काही फुले वेचण्याची,
काही तुरे खोचण्याची.
पिवळा, निळा, जांभळा आहे,
शुभ्र नसला तरी थोडा
अब्रा-गब्रा पांढरा आहे.
प्रकाश विझल्यावर मात्र
आसमंत काळा आहे.
थोडा तर्क, थोडी समीकरणे,
बरीचशी हिशोबाची उदाहरणे,
दोन्ही बाजू बरोबर आणि
ताळा बरोबर बसला आहे.
तरीही काही शिल्लक राहते,
थोडे धन, थोडे ऋण.
आयुष्याची पस्तीस वर्षे:
काही फुले वेचण्याची,
काही तुरे खोचण्याची.
आणखी बरीचशी
रोजचे दळण दळण्याची...
कुठले पातक झाले हातून,
कि माथ्यावरचा मणी हरवावा?
कमल, शंख, चक्राबरोबर,
एका हातात वाडगा यावा.
माई, थोडं तेल देता?
या जखमेला लावायला...
नोव्हेंबर २०१६
No comments:
Post a Comment