Thursday, April 30, 2020

संसार

संसाराच्या गाडीला या
असतात म्हणतात दोन चाके
त्यावर बसून चिल्लीपिल्ली
जिकडे हाकती तिकडे जाते.

गाडीवर या बसावयाला
पिल्ले नव्हती बरेच झाले
कारण दोन चाकांमधले
ऍक्सल आता तुटले आहे.

एक चाक फतकल मारून
तिथेच आता बसले आहे.
कुठे जायचे आणि कशाला
याचे त्याला कोडे आहे.

दुसरे चाक म्हणे जाईन
दूर दूरवर फिरायला,
नकोच आहे मानगुटावर
या गाड्याचा अवजड बोजा!

सफरीत माझ्यातर कधीही
चढाव मुळी येणारच नाही,
आला तरीही समर्थ आहे
उंच कडे चढायलाही!

फतकल मारून बसलेले
चाक कधीकधी हळवे होते.
म्हणते रास्ता सुंदर होता,
सुंदर होता पुढची स्वप्ने!

०९ मे २०१३

No comments:

Post a Comment