उतरवुनी पर्ण-संभार सगळा
झाड एक संन्यस्त खडे,
आत दृष्टी वळवुनी म्हणे,
शोधीन मी माझी मुळे.
उतरवुनी पर्ण-संभार सगळा
झाड हे संन्यस्त खडे,
वेड्यापरी याला कधी
असतील का आली फुले?
उतरवुनी पर्ण-संभार सगळा
झाड हे संन्यस्त खडे,
झाड एक संन्यस्त खडे,
आत दृष्टी वळवुनी म्हणे,
शोधीन मी माझी मुळे.
उतरवुनी पर्ण-संभार सगळा
झाड हे संन्यस्त खडे,
वेड्यापरी याला कधी
असतील का आली फुले?
उतरवुनी पर्ण-संभार सगळा
झाड हे संन्यस्त खडे,
म्हणते मला प्रत्यक्ष भोगूदे
पाऊस, प्रकाश अन् चांदणे!
पानांस हरवून बसलेले,
झाड हे पुरते खुळे.
पानांतुनी कळलेच असते
किती पसरली होती मुळे,
पानांतुनी कळलेच असते
हा निंब कि सीताफळे.
शतपानांनी प्यायले असते
प्रकाश पाऊस चांदणे,
कोकीळ मैना नाही तरीही
राहिलेच असते कावळे!
२७ फेब्रुवारी २०१३
No comments:
Post a Comment